Sheetal Kshirsagar: अभिनेत्री शीतल क्षीरसागरने (Sheetal Kshirsagar) छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं काही निगेटिव्ह भूमिका देखील साकारल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे शीतल क्षीरसागरला विशेष लोकप्रियता मिळाली. शीतल क्षीरसागर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. शीतलच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतात शीतलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


शीतल क्षीरसागरने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चुलीवर तांदळाची भाकरी भाजताना दिसत आहे. तसेच ती भाकऱ्या थापताना देखील दिसत आहे. या व्हिडीओल शीतलनं कॅप्शन दिलं, "चुलीवरची तांदळाची भाकरी, मी पहिल्यांदाच केली."


शीतलच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स


शीतल क्षीरसागरच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.  एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कधी येऊ भाकर खायला?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खुप छान'


पाहा व्हिडीओ






शीतलच्या मालिका


शीतल क्षीरसागरने एक होती वादी या चित्रपटात काम केलं. माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath), रामा राघव या मालिकांमध्ये काम केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तिनं साकारलेल्या सिम्मी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तसेच रमा राघव या मालिकेत लावण्या ही भूमिका ती साकारत आहेत.  या मालिकेत  निखिल दामले,  ऐश्वर्या शेटे हे कलाकार प्रमूख भूमिका साकारतात.  


शीतल क्षीरसागर ही सोशल वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 15.7K  फोलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत असतात. 


 इतर महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते' ते 'सुख म्हणजे नक्की काय असतं'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!