Madhurani Prabhulkar Post : 'आई कुठे करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) सध्या चर्चेत आहे. मधुराने उष्णतेच्या काळात स्वत:ला कूल कसं ठेवायचं हे सांगणारी खास पोस्ट लिहिली आहे.
मधुराने लिहिलं आहे,"या उष्णतेच्या काळात स्वत:ला कूल ठेवण्यासाठी नैसर्गिक अत्तरं ही माझी लाइफ सेव्हर्स. त्यात मोगरा आणि वाळा माझे अतिशय लाडके. माझी ही सुंगधाची आवड माझ्या असिस्टंट रिसायतला चांगलीच माहिती आहे. तो नेहमी देशमुखांच्या बागेतून माझ्यासाठी गुलाबाची, प्राजक्ताची फुलं आणून देत असतो".
अरुंधतीच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
अरुंधतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुझी फुलांची आवड छानच आहे. पण मला तुला पाहूनच खूप शांत आणि थंड वाटतं. तुम्ही नेहमीच खूप कमाल दिसता, किती सुंदर, फुलांचा सुगंध आणखीनच दरवळेल अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
मधुराणी प्रभुलकरने याआधीदेखील एक खास पोस्ट लिहिली होती. मित्र मैत्रिणींनो, प्रचंड उन्हाळा आहे आणि त्यातही घराबाहेर पडून आपली कामं करत राहणं तर भाग आहे. अशावेळी ताक, नारळपाणी, सरबत पीत पाहून आपली काळजी घ्यायची. तुम्हीही स्वत:ची आणि आपल्या माणसांची काळजी घेत रहा".
मधुराणी प्रभुलकरचा प्रवास जाणून घ्या...
मधुराणी प्रभुलकर लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे. सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मधुराणीने मनोरंजनसृष्टीत काम करायला सुरुवात केली. नवरा माझा नवसाचा, सुंदर माझे घर, आरोहन अशा अनेक सिनेमांत मधुराणी झळकली आहे. तसेच 'असंभव', 'इंद्रधनुष्य' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे. मधुराणी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
संबंधित बातम्या