Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharala tar mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.


3.  टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.


5. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.


6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'कुन्या गावाची गं तू रानी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.  


8. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'लग्नाची बेडी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.


टीआरपीच्या शर्यतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पडली मागे


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम मागे पडला आह. या कार्यक्रमाला फक्त 0.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला 1.5 रेटिंग मिळाले आहे. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कथाबाह्य कार्यक्रमाला 0.6 रेटिंग मिळाले आहे. तसेच 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाला 0.5 रेटिंग मिळाले आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Serials : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'; 'या' आठवड्यात कोणत्या मालिकेने मारली बाजी?