Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Milind Gawali: 'जन्म तारखेचा घोळ...'; आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकरतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच त्यांची पत्नी दिपा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte: अनिषसाठी घेतलेली साखरपुड्याची अंगठी हरवली; 'आई कुठे काय करते!' मालिकेचा प्रोमो व्हायरल


Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे.  लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये ईशा आणि देशमुख कुटुंब हे शॉपिंग करताना दिसले. आता आई कुठे काय करते या मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की अनिषसाठी घेतलेली अंगठी ही हरवली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bigg Boss OTT Season 2 Updates: करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'; कोणते कलाकार शोमध्ये होणार सहभागी?


Bigg Boss OTT Season 2 Updates:  'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'बिग बॉस ओटीटी' चा पहिला सिझन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) होस्ट केला होता. आता लवकरच बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेळी हा शो करण जोहर नाही तर अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराने सगळ्यांना सांगितलं सत्य; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  या मालिकेत स्वरा ऊर्फ स्वराजला गेल्या कित्येक दिवसांपासून बोलता येत नाहीये. पण सध्या तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज म्हणजे स्वराला आता बोलता येत आहे. हे पाहुन मल्हारला आनंद झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेत्रीनं असित मोदी यांच्यावर केला लैंगिक छळाचा आरोप; प्रॉडक्शन हेडने आरोप फेटाळले


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi)  हे सध्या चर्चेत आहेत.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि  एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा