Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकरतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच त्यांची पत्नी दिपा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
मिलिंद यांनी दिपा यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिपा यांचे काही फोटो दिसत आहे. या व्हिडीओला मिलिंद यांनी कॅप्शन दिलं, 'दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा , नेहमी सारखं सतत हसत रहा .अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच inspire करत रहा.अशीच रहा आणि नशीबवान आहेस तू ,तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात, वर्षानुवर्ष वाढदिवस नऊ मे या तारखेला साजरा केला जातो, खरं तिचा जन्म दहा मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी 9 ला साजरा केला जातो, कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताईचा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा,आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे. म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे.
पुढे मिलिंद यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'खूप अश्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता. शाळेत अॅडमिशनसाठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती,मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं, पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे, बऱ्याच लोकांचा जन्म तारखे बरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे. चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं.आता Precise and exact time of birth दिला जात असावा.पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते. कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले ही असतात. डबल सेलिब्रेशन करायला मिळातं. तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या डबल शुभेच्छा.'
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.
इतर महत्वाच्या बातम्या: