Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Milind Gawali : "चालू शूटिंग थांबवून तिच्या सीनचं"; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वत्र पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. "चालू शूटिंग थांबवून तिच्या सीनचं", असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "सगळ्या सिनेमांमध्ये देखील फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच किरण माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तसेच सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती यावर भाष्य केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rutuja Bagwe : मोदक पौष्टिक असतात.. बिनदास्त खा; अभिनेत्री ऋतुजा बागवेचा चाहत्यांना सल्ला
Rutuja Bagwe On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पाचं प्रत्येकासोबत एक वेगळं नातं असतं. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठीही बाप्पा खूप खास असतो. अभिनेत्री ऋतुजा बागवेसाठी (Rutuja Bagwe) यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे. अभिनेत्री बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट करते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."
Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही सध्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेमध्ये ती सायली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारते. ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता जुईनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पुढचं पाऊल या गाण्याचं टायटल साँग गाताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jitendra Awhad : 'वर्षा'वरील बाप्पाची आरती 'त्याच्या' हस्ते..."पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान"; जितेंद्र आव्हाड संतापले
Jitendra Awhad Tweet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान 'बिग बॉस ओटीटी'चा (Bigg Boss OTT) विजेता युट्यूबर एल्विश यादवने (Elvish Yadav) बाप्पाची आरती केली. एल्विशने बाप्पाची आरती केल्याने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) संतापले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं आहे.