Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वत्र पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. "चालू शूटिंग थांबवून तिच्या सीनचं", असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेतील बालकलाकार म्हणजे त्विशा. 'त्विशा' या मालिकेत जानकीचं पात्र साकारत आहे. जानकी ही अभिषेक आणि अनघा यांची मुलगी आहे. त्विशा आता मोठी होत असल्याने तिचा एक गोड व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट लिहिली आहे. 


मिलिंद गवळींची पोस्ट काय आहे? (Milind Gawali Post)


मिलिंद गवळींनी लिहिलं आहे,"त्विशा' हे 'आई कुठे काय करते' या मालिकेतील छोटसं पिल्लू 'जानकी'. अगदीच काही महिन्याची असताना मालिकेत तिची एन्ट्री झाली.आणि आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या झोपायच्या वेळा सगळं सांभाळल्या जातात, तसंच त्विशाच्या बाबतीतही अगदी तसंच सगळं पाळलं जातं, मधेच एखादा असिस्टंट धावत यायचा की कि त्विशा आता उठली आहे . आता ती छान खेळते आहे, मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सिनच शूटिंग सुरू करायचं. सेटवर सगळ्यांसोबत तिचं छान जमतं". 




मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"मालिकेत माझ्या वाटेला तीचे सीन फार कमी आले आहेत.पण जेव्हा तिच्यासोबत सीन लागलाय तेव्हा आपण शूटिंग करतो असं वाटायचं नाही.  लहान मुला बरोबर लहान मुलासारखा आपण खेळतोय असंच वाटायचं, खरंतर अनिरुद्ध देशमुख ला या गोष्टींची फार गरज असते, पण काल त्विशा बरोबर माझा सीन होता,
आणि हल्ली ती ज्या पद्धतीने धावते पळते एका जागेवर स्वस्त बसत नाही, अख्या सेट भर ती फिरत असते, कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं, काल अचानक तिचे 'आई कुठे काय करते' मध्यले सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून गेलं". 


त्विशाबद्दल बोलताना मिलिंद गवळी म्हणातात,"लहान बाळ परमेश्वराचे रूप असतात असं म्हणतात ते काय खोटं नाही.तिला उदंड आयुष्य यश आरोग्य आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना".


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte:'खरंतर मी एक ऑड मॅन आऊट होतो...'; ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट