Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा (Sairat) रेकॉर्ड मोडू शकतो. 


'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'


नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'सैराट' हा सिनेमा 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रोमँटिक नाट्य असणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. चार कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने 110 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. आता केदार शिंदेंचा (Kedar Shinde) 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 'सैराट'चा रेकॉर्ड मोडण्यास सज्ज आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने आतापर्यंत 89.6 कोटींची कमाई केली आहे. 


'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दहा दिवसांत 26.19 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा महाराष्ट्रातील 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता दुसऱ्या आठवड्यात स्क्रीन्सची संख्या 700 पर्यंत वाढवण्यात आली. पुढे 750 स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवला गेला. आठवड्याला या सिनेमाचे 14 हजारांहून अधिक शो सुरू होते. आता रिलीजच्या 45 दिवसांत सिनेमाने जगभरात तब्बल 89.6 कोटींची कमाई केली आहे.


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' (Ved) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा केदार शिंदे यांनी पुरुषांसाठी बनवला होता. पण महिलांनीच या सिनेमाला डोक्यावर घेतलं. त्यामुळे आता निर्मात्यांनी या सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त 100 रुपये ठेवली आहे.


केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या गर्दीतला मराठमोळा 'भारी' आकडा 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने जमवला आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा आता महिलांचा राहिला नसून संपूर्ण कुटुंबाचा झाला आहे. तिने पाहिलाच आहे सिनेमा..आता प्रतीक्षा आहे त्याची... जो 'तिला' नक्की सिनेमागृहात घेऊन जाईल, असं म्हणत आता सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा : राज ठाकरे