Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...



Aadesh Bandekar Profile : नारळी पौर्णिमेला नारळ विकले, इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय, ढोलही वाजवले, लाडक्या आदेश भाऊजींचा 'होम मिनिस्टर'पर्यंतचा प्रवास


Aadesh Bandekar : लोकांच्या मिरवणुकीत ढोल वाजवण्यापासून ते अगदी नारळी पौर्णिमेला नारळ विकण्यापर्यंत ते थेट लोकांच्या लग्नासाठी इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय करण्यापर्यंतची कामे आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी केली आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत ते नोकरीला लागले. पाच-सहा वर्षे त्यांनी केस पेपर देण्याचं कामही केलं. 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे ते लाडके भाऊजी झाले. आदेश बांदेकर हे निवेदक, सूत्रसंचालक असण्यासोबत एक उत्तम अभिनेते आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मालिका, नाटके आणि सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. मनोरंजनसृष्टी गाजवण्यासह समाजकारण आणि राजकारणातही ते सक्रिय आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jaubai Gavat : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गाणं वाजणार; 'जाऊ बाई गावात'चं गावरान गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


Jaubai Gavat : छोट्या पडद्यावर मालिकांसह (Marathi Serials) वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावे यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. 'जाऊ बाई गावात' (Jaubai Gavat) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमाचं गावरान वेलकम गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Dharmaveer 2 : सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी, 'धर्मवीर 2' सिनेमाचं शूटिंग सुरु


Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजला. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,"धर्मवीर 2' या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे". 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bharat Jadhav: "विचार करायला लावणारा विषय"; भरत जाधवच्या अस्तित्व नाटकाचं प्रेक्षक करतायत भरभरुन कौतुक


Bharat Jadhav: भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' (Astitva) हे नाटक गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकामध्ये चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या पुणे, मुंबई, ठाणे येथे अस्तित्व या नाटकाचे प्रयोग होत आहेत. नुकताच अभिनेता भरत जाधवनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये 'अस्तित्व' या नाटकाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jhimma 2 Box Office Collection Day 3 : 'झिम्मा 2'चा विकेंडला धमाका; बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई


 'झिम्मा 2' हा बहुचर्चित मराठी सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून आता 'झिम्मा 2'देखील धमाका करत आहे.