Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Mumbai Diaries Season 2: मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये 'हे' मराठमोळे कलाकार साकारणार भूमिका


Mumbai Diaries Season 2:  मुंबई डायरीज (Mumbai Diaries) या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुंबई डायरीज-2  या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जोरदार पाऊसामुळे मुंबईमधील लोकांची उडालेली तारांबळ आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी केलेली लोकांची मदत, हे मुंबई डायरीज-2  वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. मुंबई डायरीज-2 या वेब सीरिज ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांनी झलक देखील बघायला मिळत आहे. जाणून घेऊयात मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दल


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kushal Badrike : "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय"; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो. कुशल हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कुशल हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतीच एक खास पोस्ट कुशलनं शेअर केली आहे. कुशलनं या पोस्टमध्ये त्याच्या एका हरवलेल्या वस्तूचा उल्लेख केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Movies: ऑक्टोबर महिन्यात मनोरंजनाचा धमाका; 'हे' मराठी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Marathi Movies: वेगवेगळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असतात. ऑक्टोबर महिना हा सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात  काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kiran Mane: "भल्याभल्या वाघांची शेळी झालीये"; किरण मानेंची पोस्ट चर्चेत


Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी विविध घटनांवर भाष्य केलं आहे. किरण माने यांनी या पोस्टमध्ये पुण्यातील (Pune) गांधी भवन (Gandhi Bhavan) येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देखील दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ashvini Mahangade: "नाना खूप अभिमानाने सांगायचे की, मी लाकूडतोड्या आहे..."; अश्विनी महांगडेनं दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा


Ashwini Mahangade:  अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. ती या मालिकेत अनघा ही व्यक्तिरेखा  साकरते. अश्विनी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतीच अश्विनीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अश्विनीनं तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा