Mumbai Diaries Season 2: मुंबई डायरीज (Mumbai Diaries) या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जोरदार पाऊसामुळे मुंबईमधील लोकांची उडालेली तारांबळ आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी केलेली लोकांची मदत, हे मुंबई डायरीज-2 वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. मुंबई डायरीज-2 या वेब सीरिज ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांनी झलक देखील बघायला मिळत आहे. जाणून घेऊयात मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दल
मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजमध्ये अभिनेते शरद पोंक्षे हे महत्वाची भूमिका साकारणार आहेत. वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये त्यांनी झलक बघायला मिळत आहे. शरद पोंक्षे यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी नविन वेबसिरीज “मुंबई डायरीज 2” 6 ऑक्टो पासून येत आहे आवश्य पाहा'.
मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. मृण्मयीनं मुंबई डायरीजच्या पहिल्या सीझनमध्ये देखील काम केलं होतं. तसेच मुंबई डायरीज-2 सीरिजच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची झलक देखील बघायला मिळत आहे.
मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज 6 ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma), मोहित रैना (Mohit Raina), टीना देसाई (Tina Desai), श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary), सत्यजीत दुबे (Satyajeet Dubey) ,प्रकाश बेलावाडी (Prakash Belawadi) यांनी देखील काम केलं आहे. भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज स्ट्रीम केली जाणार आहे. प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या :