Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या दहा क्रमांकावर आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार एममेकांसाठी खास पोस्ट लिहित आहे. अशातच मालिकेतील कार्तिकने म्हणजेच ऋतुराज फडकेने (Ruturaj Phadake) पौर्णिमा तळवलकरसाठी (Purnima Talwalkar) एक खास पोस्ट लिहिली आहे. 


आमच्या सेटवरची सर्वात गोड मुलगी असे म्हणत ऋतुराजने एक खास पोस्ट लिहिली आहे. ऋतुराजने लिहिलं आहे. "होणार सून मी या घरची' ही मालिका आमच्या घरी रोज बघायचे. त्यात पौर्णिमा ताईने साकारलेली बेबी आत्या म्हणजे अप्रतिम होती, खूप राग यायचा, मी एक समज केला होता, खूप खडूस असणार ही बाई... आधी मी एक मालिका करत होतो, तेव्हा पण ती एक दोन वेळा सेट वर येऊन गेली पण कधी बोलण नव्हतं झालं, कारण सुद्धा हेच की मी तिला घाबरायचो".






ऋतुराजने पुढे लिहिलं आहे, कालांतराने योग आलाच... 'मन उडू उडू झालं' मालिकेत पौर्णिमा माझ्या आईची भूमिका करणार होती. पहिल्या दिवशी मी तिच्यासोबत घाबरत बोलत होतो. पण या पोरीने पुढच्या दोन ते तीन तासात मला एकदम कम्फर्टेबल केलं. माझ्यासोबत बोलायला आली. आमच्यासोबत फोटो काढले. पण आज असं झालं झालं आहे, ती सेटवर किंवा मेकअप रूममध्ये माझ्या आजूबाजूला हवी...सतत तिचा हसतमुख चेहरा दिसायला हवा. ती दिसली नाही तर कंटाळा येतो. रोज आमच्या सगळ्यांसाठी घरातून डबा घेऊन येते. सतत हसतमुख असते. सेटवर कधीच कोणावर चिडलेलं मी तिला पाहिलेलं नाही". 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप; अजिंक्यने केली खास पोस्ट