Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सध्या अनपेक्षित वळणे घेत आहे. सानिकाचे कार्तिकसोबत लग्न झाले असून ती लवकरच आई होणार असल्याचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. मालिकेत सानिकाचा स्वार्थीपणा देशपांडे सरांच्या जीवावर बेतणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 


मालिकेत सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे. सदाचारी देशपांडे सरांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केले आहे. तसेच ती लवकरच आई होणार आहे. यामुळे देशपांडे सरांना मोठा धक्का बसला आहे.





नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एकीकडे इंद्रा-दीपू म्हणत आहेत, सानिकाच्या स्वार्थीपणामुळे देशपांडे सरांनी स्वत:ला त्रास करून घ्यायला नको. त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 


संबंधित बातम्या


Rashmi Desai : ‘बिग बॉस’नंतर रश्मी देसाई कंगनाच्या ‘लॉक अप’मध्ये एण्ट्री घेणार, ‘वाईल्ड कार्ड’ स्पर्धक बनून जेल गाजवणार!


Majhi Tujhi Reshimgath : यशसोबत लग्न करण्यासाठी नेहा आजोबांपासून लपवणार का परीचं सत्य?


Sarkha Kahitari Hotay : ‘सारखं काहीतरी होतंय!’, 36 वर्षांनी एकत्र दिसणार प्रशांत दामले-वर्षा उसगांवकरांची जोडी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha