Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण यशसोबत लग्न करण्यासाठी नेहाला आजोबांपासून परीचं सत्य लपवावं लागणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 


मालिकेच्या प्रोमोमध्ये यश नेहाला म्हणतो, आजोबांसमोर परीचा विषय काढू नको. दरम्यान आजोबा नेहाला एक सोन्याचा हार देतात. हार देत म्हणतात, यशच्या आजीने हा हार नात सूनबाईसाठी ठेवाला होता. त्यामुळे हा हार आता तुझा आहे. त्यामुळे नेहा भावुक होते.





मालिकेत परीने नुकतीच यश आणि नेहाच्या लग्नाला मान्यता दिली आहे. पण परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य यशच्या आजोबांना समजल्यावर ते नेहा आणि यशच्या लग्नाला मान्यता देतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Sarkha Kahitari Hotay : ‘सारखं काहीतरी होतंय!’, 36 वर्षांनी एकत्र दिसणार प्रशांत दामले-वर्षा उसगांवकरांची जोडी


Sher Shivraj, Waghnakh : एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’! ‘शेर शिवराज’ला टक्कर देणार ‘वाघनखं’


The Kashmir Files Box Office Collection Day 11 : ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा, 11व्या दिवशीही जमवला ‘इतका’ गल्ला!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha