Lock Upp : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) छोट्या पडद्यावर धमाल करत आहे. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सामील झाले आहेत, जे आपल्या सर्व सुविधा सोडून तुरुंगात राहत आहेत. या शोमधून प्रेक्षकांना सेलेब्सची अनेक गुपिते कळत आहेत. चेतन हंसराजने अलीकडेच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश केला आहे. दर्शक दिवसभर OTT प्लॅटफॉर्मवर शो पाहू शकतात. आता या शोमध्ये एक नवीन एंट्री होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस’मध्ये धमाल उडवणारी अभिनेत्री रश्मी देसाईची एंट्री या शोमध्ये होऊ शकते.


मीडिया रिपोर्टनुसार रश्मी देसाई या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. रश्मीने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. तसेच, रश्मीच्या एण्ट्रीबाबत निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. रश्मीचे चाहते तिच्या एण्ट्रीची वाट पाहत आहेत.


रश्मी ‘लॉक’ होणार?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, रश्मी देसाई या शोची 16वी स्पर्धक असणार आहे. आता रश्मी एकता कपूरच्या या शोमध्ये कैदीच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मी शोमध्ये आल्याची बातमी ऐकून चाहते खूप खूश झाले आहेत. अनेक लोक रश्मीला सपोर्ट करत आहेत.


रश्मी देसाई सलमान खानच्या शो बिग बॉस 13 चा भाग बनली होती. ती खूप लवकर शोमधून बाहेर पडली. त्यानंतर रश्मी पुन्हा ‘बिग बॉस 15’चा भाग बनली होती. या शोमध्ये त्याने ‘टॉप 5’मध्ये आपले स्थान निर्माण केले. रश्मीने काही सेलिब्रिटींसोबत व्हीआयपी स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता.


‘लॉक अप’बद्दल बोलायचे झाले, तर या आठवड्यात रेसलर बबिता फोगट शोमधून बाहेर गेली आहे. शोमध्ये दोन वाईल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहे. ज्यामध्ये पहिला सारा खानचा माजी पती अली मर्चंट आणि दुसरा चेतन हंसराज यांचा समावेश आहे. शोमध्ये कंगना रनौत वीकेंडला स्पर्धकांची शाळा घेताना दिसत आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha