Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सध्या अनपेक्षित वळणे घेत आहे. सानिका आई होणार असल्याचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर येणार आहे. अशातच इंद्रा-दीपूचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सत्यदेखील सानिकाला कळणार आहे. 


इंद्राची आई दीपूसाठी लग्नाची मागणी घालायला देशपांडे सरांच्या घरी येते. दरम्यान ती दीपूसाठी बनवलेल्या सोन्याच्या बांगड्यादेखील सोबत घेऊन जाते. मात्र सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचे कळल्यानंतर ती त्या बांगड्या तिथेच ठेऊन घरी जाते. सानिकाला वाटतं सासूबाईंनी तिच्यासाठी बांगड्या आणल्या आहेत. पण या बांगड्या दीपूच्या मापाच्या निघतात. त्यामुळे आता सानिकाला इंद्रा-दीपूचं एकमेकांवर प्रेम असल्याचं समजणार आहे.





'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 


संबंधित बातम्या


Sanjay Dutt : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्यासोबत संजय दत्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण


Shashi Kapoor : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा


The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha