Shashi Kapoor : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले दिवंगत अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांची आज 84 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच कपूर कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 


दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि कुणालचा मुलगा Zahaan यांनी सोशल मीडियावर शशी कपूर यांचा फोटो शेअर केला आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. 1961 मध्ये धर्मपुत्र या सिनेमाच्या माध्यमातून शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.





अभिनेत्री नंदा यांच्यासोबत शशी कपूर यांचे मोहब्बत इसको कहते है, जब जब फूल खिले, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, राजा साब, रुठा ना करो यासारखे अनेक सिनेमे गाजले. राखी, शर्मिला टागोर, झीनत अमान सोबतही त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीवार सिनेमातील त्यांची जुगलबंदीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई


Pawankhind :  बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'पावनखिंड' ओटीटीवर; 'या' दिवशी होणार रिलीज


Russia Ukraine Crisis :  रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha