Sanjay Dutt With Pervez Musharraf : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच कटू राहिले आहेत. सध्या बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.





व्हायरल होणाऱ्या फोटोत परवेझ मुशर्रफ व्हील चेअरवर बसले आहेत. तर संजय दत्त त्यांच्या समोर उभा आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. फोटोवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. मुशर्रफ यांची प्रकृती पाहून काहींना त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली आहे. तर काही खिल्ली उडवत आहेत.


मुशर्रफ आणि संजय दत्तची भेट दुबईत झाली आहे. सध्या या फोटोने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांना जबाबदार धरलं जातं. त्यामुळे कारगिल युद्धाच्या मास्टरमाइंडसोबत संजय दत्त काय करतोय अशा आशयाचे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 


संजय दत्त दिसणार KGF 2
KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  संजय दत्त मुख्य खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा ‘अधीरा’ लूक याआधीच समोर आला आहे. ‘अधीरा’ हे पात्र KGF Chapter 2चा मोठा युएसपी आहे.


संबंधित बातम्या


Shashi Kapoor : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा


Katrina Kaif - Vicky Kaushal : होली है... कतरिना-विकीने कुटुंबियांसोबत साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी


The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha