Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. देशपांडे सरांची प्रकृती आता सुधारत असल्याने मालिकेत आता होळी विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात इंद्रा आणि दीपू एकमेकांना रंग लावताना दिसणार आहेत. 


'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात सोनटक्के सर देशपांडे सरांना भेटायला रुग्णालयात जातात. तेव्हा ते इंद्रा आणि दीपूच्या नात्यासंदर्भात बोलू लागतात. दरम्यान दीपू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. मालिकेत इंद्रा आणि दीपूने एकमेकांना रंग लावला असल्याने दीपूच्या आईला संशय आला आहे.





'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर


पुन्हा ढोलकीच्या तालावर! तमाशाची पंढरी नारायणगावात दोन वर्षांनंतर फड रंगले


Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, 'तु ज्यांचे शोषण केले....'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha