The Kashmir Files : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर 'द कश्मीर फाइल्स’ची (The Kashmir Files) बॉक्स कमाई अजूनही जोरदार सुरु आहे. या चित्रपटाची कमाई दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. व्यापार तज्ज्ञांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, 11व्या दिवशी आकड्यांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली. असे असले तरी दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाने 12 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने 11 दिवसांत एकूण 179 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

प्रसिद्ध व्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर चित्रपटाच्या 11व्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 19.15 कोटींची कमाई केली होती, शनिवारी ही कमाई 24.80 कोटी रुपये इतकी झाली. तर, रविवारी चित्रपटाने 26.20 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर सोमवारी या चित्रपटाने 12.40 कोटींचा व्यवसाय केला. यासह, चित्रपटाची एकूण कमाई 179.85 कोटींवर गेली आहे. तिसऱ्या वीकेंडपूर्वी हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

'द कश्मीर फाइल्स'चे आतापर्यंतचे कलेक्शन

दिवस 1 - 3.55 कोटी

दिवस 2 - 8.50 कोटी

दिवस 3 - 15.10 कोटी

दिवस 4 - 15.05 कोटी

दिवस 5 - 18 कोटी

दिवस 6 - 19.05 कोटी

दिवस 7 - 18.05 कोटी

दिवस 8 - 19.15 कोटी

दिवस 9 - 24.80 कोटी

दिवस 10 – 26.20 कोटी

दिवस 11 – 12.40 कोटी

एकूण - 179.85 कोटी

प्रेक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीयत. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि पुनीत इस्सर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.   

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha