Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. आता यश-नेहाचं प्रेम होळीच्या रंगात रंगणार आहे. तर परी बाबा म्हणून स्वीकार करायला यशचा  इंटरव्ह्यू घेणार आहे.


यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं कबुल करतो. त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत धुळवडीचा रंग चढताना दिसणार आहे. दुसरीकडे यशला नेहासोबत लग्न करण्यासाठी परीच्या  इंटरव्ह्यूमध्ये पास व्हावे लागणार आहे. 


नेहा आणि यशचे प्रेम फुलत असले तरी परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अनेक रंजक वळणं येत आहेत. यश आणि नेहाने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली असली, तरी परी यशचा स्वीकारेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.






श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, इंद्रा-दीपूच्या प्रेमाबद्दल सानिकाला कळणार?


Shashi Kapoor : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा


Russia Ukraine Crisis :  रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha