Majha Katta : सर्वसामान्य माणसाला गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात. लोकांचं गोष्टींवरचं हेच प्रेम लक्षात घेऊन, सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) हे दोघे जण 'एकदा काय झालं' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणारा हा सिनेमा असणार आहे. याच सिनेमाची पडद्यामागची गोष्ट सुमीत आणि सलील एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये उलगडणार आहेत.


मला लहान मुलांच्या विश्वाबाबत उत्सुकता: सलील कुलकर्णी
'लहान मुलांच्या विश्वाबाबत मला नेहमी उत्सुकता वाटते. लहान मुलांसाठी त्यांचा पहिला सुपरमॅन आपणच असतो कारण ज्या कपाटावर लहान मुलांची हात पोहचत नाही फक्त नजर पोहचते त्याच कपाटावरच्या वस्तू आपण त्यांना सहजपणे देत असतो', असं माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये सलील कुलकर्णीनं सांगितलं. 'एकदा काय झालं' या चित्रपटाचं दिग्दर्शन सलीलनं केलं आहे. दिग्दर्शन करताना आलेल्या अनुभवाबद्दल सलील म्हणाला,' फिल्ममेकिंग करणं हे अवघड काम आहे. मी संगीतकार म्हणून काम करत होतो तेव्हा मी बऱ्याच गोष्टी बघत होतो. जेव्हा मी कार्यक्रमांचे परीक्षण करत असताना कॅमेरा अँगल्स आणि इतर गोष्टींचे निरीक्षण करत होतो. जेव्हा मी 'एकदा काय झालं' या सिनेमाच्या निर्मितीचा विचार करत होतो तेव्हा मला या चित्रपटातील गोष्टी सांगाणारा माणूस हा सुमीत राघवन साकारु शकतो असं वाटलं'


चित्रपटातील भूमिकेबाबत सुमीत राघवन म्हणाला, 'मी आणि सलील मित्र आहोत. त्याचं काम मला माहित आहे. त्यामुळे तो नवा प्रोजेक्ट करतोय हे कळाल्यावर मी लगेच होकार दिला.'


सोशल मीडिया आणि सुमीत राघवन 


सोशल मीडियावर सुमीत राघवन हा नेहमी अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट तो शेअर करतो. या सर्व गोष्टींचा परीणाम कधी करीअरवर झाला आहे का? असा प्रश्व सुमीतला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत सुमीत म्हणाला, 'अजिबात नाही, माझा चित्रपट रिलीज होणार आहे म्हणून मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो असं नाही. मी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मत मांडतो. या गोष्टीचा माझ्या कामावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.'


वाचा इतर बातम्या: