Bigg Boss 16 Premier Date : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) प्रीमियर होणार आहे.
बिग बॉसचे 16 वे पर्व सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 1 ऑक्टोबर 2022 रोजी कलर्स चॅनलवर या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. निर्माते लवकरच अधिकृतरित्या यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.
'बिग बॉस 16'चा प्रोमो होणार आऊट
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून 'बिग बॉस 16'चे सूत्रसंचालन करत आहे. यंदाच्या पर्वातदेखील भाईजानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमानने 'बिग बॉस 16'च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे लवकरच 'बिग बॉस 16'चा प्रोमो आऊट होणार आहे.
'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक होणार सहभागी?
'बिग बॉस 16'मधील स्पर्धकांची नावे समोर आली आहे. दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi), अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani), शाइनी दोशी (shiny Doshi), सनाया ईरानी (Sanaya Irani) अशा अनेक कलाकारांची नावं 'बिग बॉस 16' साठी चर्चेत आहेत.
तेजस्वी प्रकाश ठरली होती 'बिग बॉस 15'ची विजेती
'बिग बॉस 15' ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. 2 ऑक्टोबर 2021 रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला होता. तर 30 जानेवारी 2022 रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिमसोहळा रंगला होता. मराठमोळी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) 'बिग बॉस 15'ची विजेती ठरली होती.
फरमानी नाजची होणार बिग बॉसमध्ये एन्ट्री
'हर हर शंभू' गाणं गाणारी फरमानी नाज 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. फरमानी नाजला 'बिग बॉस 16' साठी विचारणा झाली आहे. फरमानीदेखील या गोष्टीवर विचार करत आहे. फरमानी नाज बिग बॉसमध्ये सहभागी होणार की नाही हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.
संबंधित बातम्या