Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं (Sonali Bendre) नुकतीच एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सोनालीनं तिच्या बालपणीचे किस्से, रुईया कॉलेज आणि तिचं असणारनं, कॅन्सरशी झुंज नातं तसेच बॉलिवूडमध्ये काम करताना आलेले अनुभव या सर्व गोष्टींबाबत गप्पा मारल्या.


बालपणीचे किस्से
सोनालीनं तिच्या बालणीचे काही किस्से सांगितले. तिनं सांगितलं की, तिचा स्वभाव हा फार हट्टी होता. तसेच सोनालीनं तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबत देखील सांगितलं. सोनाली म्हणाली, 'आमच्या घरामध्ये टिव्ही, मोबाईल, टेलिफोन या सर्व गोष्टी नव्हत्या. मी स्वत:च्या कमाईमधून माझं शिक्षणपूर्ण केलं. माझ्या वडिलांचा स्वभाव हा खूप कडक होता. मी मासिकांमधून आणि पुस्तकांमधून अभिनय आणि इतर गोष्टींबाबत माहिती घेत होते. आमच्या घरी फोन नसल्यानं माझ्या बहिणीच्या घरी ऑडिशनसाठी फोन येत असतं. त्यानंतर मी चित्रपटांसाठी ऑडिशन देत होते. '


कॅन्सरशी झुंज
सोनाली कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी परदेशी गेली होती.  तेव्हाच्या काही आठवणी तिनं कट्ट्यावर गप्पा मारताना सांगितल्या. ती म्हणाली, 'मी जेव्हा कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी परदेशी जाण्याचं ठरवलं तेव्हा माझ्या पतीनं मला कसलाही विचार न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मला विचार करण्याचा देखील वेळ मिळाला नाही. जेव्हा मी विमानात बसले त्यावेळी मी फक्त माझ्या कुटुंबाचा आणि घराचा विचार करत होते. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर जेव्हा मी भारतात परत आले तेव्हा माझ्या श्वानानं माझं स्वागत केलं. तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. त्यावेळी माझे घरातील काही स्टाफ मेंबर तसेच माझे कुटुंब तिथे उपस्थित होते. '


वेब सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस 


सोनालीची द ब्रोकन न्यूज ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजबाबत देखील सोनालीनं माहिती दिली. या वेब सीरिजमुळे न्यूज रुममध्ये घडणाऱ्या गोष्टी तसेच न्यूज रुममधील वातावरण या सर्व गोष्टींबद्दल माहिती मिळाली. सोनालीनं या वेब सीरिजमध्ये अमिना कुरेशी ही भूमिका साकारली आहे.