Gaurav More'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातील कलाकार हे त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला  आहे. "गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा" या गौरवच्या जबरदस्त डायलॉगनं तर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. गौरव हा सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. नुकताच गौरवनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


गौरवनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील हो गया है तुझको तो प्यार सजना या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गौरवच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौरवनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "DDLJ Fever"


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


गौरवनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "आपला आवडता मराठी कॉमेडी किंग" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "वा! हास्यजत्रेचा शाहरुख खान"


पाहा व्हिडीओ:






गौरव मोरेनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तो विविध कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमामुळे गौरवला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील गौरवच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


गौरव मोरेचा आगामी चित्रपट


गौरव मोरेचा बाईज-4 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 20 रोजी बाईज-4  हा चित्रपट रिलीज होणार आहे.


Vanita Kharat And Gaurav More: 'छोटे मियां बडे मियां'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आणि गौरव मोरेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल