Amitabh Bachchan Show:  कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati 15) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचा 15 वा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत दोन स्पर्धक हे करोडपती झाले आहेत. केबीसीच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये राहुल नावाच्या एका स्पर्धकानं हजेरी लावली. राहुलनं केबीसीमध्ये 25 लाख रुपये जिंकले. मात्र तो 50 लाख रुपयांसाठी बिग बींनी (Amitabh Bachchan) विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.


केबीसी 15 या कार्यक्रमाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये  राहुल नावाच्या एका स्पर्धकानं सुपर संदुक राऊंड जिंकला. त्याने 70 हजार रुपये जिंकले. त्यानंतर राहुलने गेममधील सर्व  लाईफलाईन वापरून 25 लाख रुपये जिंकले. केबीसीमध्ये  बिग बींनी राहुलला 50 लाख रुपयांचा प्रश्न विचारला. पण शो क्विट केला.


राहुलला विचारण्यात आलेला प्रश्न


50 लाख रुपयांच्या प्रश्नासाठी राहुलनं बिग बींना विचारलेल्या प्रश्न होता- 1983 च्या क्रिकेट विश्वचषकानंतर भारताने भविष्यातील विश्वचषकातून माघार घ्यावी, असे वृत्तपत्रात लिहिल्यानंतर कोणत्या पत्रकाराने स्वतःचे छापलेले बातमी गिळली होते?


ऑप्शन्स-


A. गिदोन हाय,


B. क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिंस


C. स्किल्ड बेरी


D. डेविड फ्रिथ


उत्तर-D. डेविड फ्रिथ


खेळ पुढे खेळण्यासाठी राहुलकडे  कोणतीही लाइफलाइन उरली नव्हती. त्यामुळेच त्यांनी 50 लाखांच्या प्रश्नावर रिस्क घेतली नाही. त्यानं गेम सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी राहुलला या प्रश्नाचे अंदाजे उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा राहुलने अचूक उत्तर दिले, यानंतर बिग बींनी त्यांना सांगितले की, जर तुम्ही रिस्क घेतली असती तर कदाचित तुम्ही 50 लाख रुपये जिंकले असते.  राहुल  हा केबीसीमध्ये 25 लाख रुपये एवढी रक्कम जिंकला.






अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. सध्या या कार्यक्रमाचा 15 वा सीझन प्रेक्षरकांच्या भेटीस येत आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाच बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Kaun Banega Crorepati 15: आधी बिग बींना मिठी मारुन ढसाढसा रडला, मग त्यांना नमस्कार केला; केबीसीमधील स्पर्धकाचा व्हिडीओ व्हायरल