ठाणे: "समीर चौघुले (Samir Choughule) मी सुद्धा तुमचा फॅन आहे. वेळ मिळेल तेव्हा हास्यजत्रा हा कार्यक्रम बघतो,  अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दाद दिली. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात (Thane) आयोजित केलेल्या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचंही कौतुक केलं. 


वेळ मिळेल तेव्हा हास्यजत्रा बघतो (CM Eknath Shinde on Maharashtrachi Hasyajatra)


"जेव्हा स्ट्रेस असतो किंवा अचानक आलो, वेळ मिळाला तर हास्यजत्रा बघतो. राज्यकारभार करताना कधी कोण काय बोलेल, काय सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे गॅसवर असतो. तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे 'हास्यजत्रा'सारखे कार्यक्रम तणाव दूर करतात", असं मुख्यमंत्री म्हणाले. 


आई कुठे काय करते मालिकेचं कौतुक (Aai Kuthe Kay Karte)


दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते  (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचंही कौतुक केलं.  "आई कुठे काय करते आपला कार्यक्रम अतिशय उत्तम सुरू आहे. श्रीकांतची आई (लता शिंदे) सुद्धा हा कार्यक्रम बघताना मी पाहायचो. कधी कधी मी पण पाहायचो. तुमची भूमिकाही उत्तम होती. तुमच्या विरोधातील भूमिका चांगली नव्हती. म्हणजे त्यांना जो रोल दिला तो त्यांनी केला. शेवटी पुरुषपण आमचे चांगले असतात", अशा कोपरखळ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावल्या. 


 मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सगळे सण अगदी आनंदात साजरे झाले पाहिजे आणि आपले सण आपण जोपासले पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 


आम्ही राज्याला कोरोना मुक्त केलं


सगळ्यांना माहीत आहे जसे आपले सरकार आले आणि कोरोना पळून गेला. काही लोकांना कोरोना हवा होता,परंतु कोरोना संदर्भात बैठक घेऊन बाऊ न करता ठोस कारवाई करत आम्ही राज्याला कोरोना मुक्त केलं. मी कधी बैठक घेतली नाही पण बैठक न घेता जे काय करायचे होते ते मी करत होतो. या काळात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.  


VIDEO :  CM Eknath Shinde speech Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण



 


संबंधित बातम्या