Rani Mi Honar : 'राणी मी होणार' (Rani Mi Honar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत लग्नाचा बार उडणार आहे. मीरा  आणि मल्हार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मीरा मल्हारची राणी होणार आहे.


मीरा होणार मल्हारची राणी 


प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाट. सगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं हे स्वप्नं पूर्ण झालंय बरं.. विषय विचार करायला लावणारा असला तरीही जर त्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रत्यक्षातल्या एखाद्याने घेतली तर.. असा एखादा जो रोज आपल्यासोबत आहे अगदी सुख-दुःखाचा साथीदारच, ज्याला न सांगता आपल्या मनातलं उमगतं, जो आपल्या स्वप्नांसाठी कायम पाठीशी उभा राहतो. असाच एखादा.. दुसरा-तिसरा कुणी नाही तर आपला मल्हार असून मीराच्या स्वप्नांना उमेद देणारा मल्हारच खऱ्या अर्थाने मीराचा राजकुमार आहे. 'राणी मी होणार' मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे.


आपल्या आयुष्याचा जोडीदार श्रीमंत असावा या विचारांच्या मीराला मल्हारच्या तिच्यावरील प्रेमाची साधी कल्पना देखील नाही आहे. मैत्रीपलीकडे झुकेलेलं हे सुंदर नातं आता एका अशा बंधनात अडकणार आहे ज्याचा दोर अगदी त्यांच्या घट्ट मैत्रीइतकाच मजबूत असणार आहे. तुमच्या लक्षात आलं असणारच आहे ते म्हणजे मीरा आणि मल्हारची लगीनगाठ बांधली जाणार आहे. 


मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?


मल्हारला तर त्याची राणी भेटली आहे. पण मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?, मल्हार मीराला आपल्या प्रेमाची कबुली कशी देईल?, एक हक्काचा मित्र की आयुष्यभराचा जोडीदार यापैकी कुठल्या नात्यात मीरा मल्हारला स्विकारेल? की हा हक्काचा मित्रच आयुष्यभराचा जिवलग जोडीदार होईल?, लग्नानंतर या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रूपांतर अतूट प्रेमात होईल का? हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडत असून याची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 


'राणी मी होणार' मालिकेबद्दल जाणून घ्या...


सुखी संसाराचं चित्र रेखाटण्यासाठी श्रीमंती फक्त आणि फक्त निर्व्याज प्रेमाची हवी हे सांगणारी 'राणी मी होणार' ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. पैसा आणि स्टेट्स यांच्या मायाजाळात अडकलेल्या पिढीला एक चांगला संदेश या मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मीराचा राजकुमार आणि मल्हारच्या राणीची ही अनोखी प्रेम कहानी असणारी 'राणी मी होणार' ही मालिका आहे.


संबंधित बातम्या


Marathi Serials : 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'ठरलं तर मग' ठरली अव्वल; वाचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट