Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Sukh Mhanje Nakki Kay Asta: शालिनी घेतेय तंत्र विद्येचा आधार; 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष


Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. जयदीप आणि गौरी यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचं काम शालिनी करत असते. 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी आणि जयदीप यांना त्रास देण्यासाठी शालिनी ही तंत्र विद्येचा आधार घेणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Anupama : 'या' कारणामुळे डिंपी भडकली; अनुपमा मालिकेत येणार ट्वीस्ट?


Anupama :  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी डिंपी आणि समर यांचा विवाह सोहळा पार पडला आहे, असं दाखवण्यात आलं. आता डिंपी आणि समर यांना लहान रुम मिळाल्यानं डिंपी चिडली आहे. सध्या अनुपमा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, लहान रुम मिळाल्यानं डिंपी ही तिच्या वहिनीवर चिडली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये झळकणार शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक


Khatron Ke Khiladi 13 Latest Update : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. आता या कार्यक्रमासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू (Abdu Rozik) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) दिसत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tirthanand Rao : 'द कपिल शर्मा'मधील कॉमेडियननं फेसबुक लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल


Tirthanand Rao Attenpted Suicide : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. काही काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. आता या कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर तीर्थनंद रावने (Tirthanand Rao) फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत धक्कादायक वळण; अनिरुद्धच्या कानाखाली मारणार संजना?


Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा आजचा भाग खूपच खास असणार आहे. आजच्या भागात संजना अनिरुद्धच्या खानाखाली मारताना दिसणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा