Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा आजचा भाग खूपच खास असणार आहे. आजच्या भागात संजना अनिरुद्धच्या खानाखाली मारताना दिसणार आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Aai Kuthe Kay Karte Todays Episode)


'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातील अनिरुद्ध संजनाला पैसे देताना दिसणार आहे. अनिरुद्धने संजनाला वाढदिवसाचं भेट न दिल्याने तो तिला पैसे देणार आहे. आता अनिरुद्धचं हे वागणं पाहून संजनाला मात्र खूप राग येतो. पण तरीही अनिरुद्ध त्याची चूक मान्य करत नाही. संजना त्याला म्हणते की,"तुला ओळखण्यात माझी चूक झाली. अरुंधतीसोबत तू जसा वागला तसंच तू माझ्यासोबत वागत आहेत. आज माझी जागा वीणाने घेतलेली आहे". 


संजनाच्या या बोलण्यानंतर अनिरुद्ध संजनावर आरोप करतो की, ती आणि प्रमोद रिलेशनमध्ये आहेत. तसेच तो संजनाला म्हणतो,"मला घटस्फोट दे आणि मग तुझ्या बॉयफ्रेंडसोबत हवं ते कर". अनिरुद्धच्या या वक्तव्याचा संजनाला खूप राग येतो आणि लगेचच ती त्याच्या कानाखाली मारायला जाते. पण तो यागोष्टीचा तिच्या विरोधात वापर करेल असा तिला अंदाज येतो आणि ती स्वत:ला रोखते. त्यानंतर त्याने दिलेले पैसे तोंडावर फेकत त्याला म्हणते की,"आता आपल्यात एवढीही जवळीक होणार नाही". 


दुसरीकडे नवरा-बायकोने एकमेकांना वेळ देणं गरजेचं असतं असं आप्पा अनघा आणि अभीला सांगतात. दरम्यान अरुंधती, सुलेखा ताई आणि वीणा त्यांचं संगीत विद्यालय आणि आश्रमाला भेट देतात. महिलांना भेटल्यानंतर वीणाला आनंद होतो आणि ती सुलेखा ताई आणि अरुंधतीचं मनापासून कौतुक करते. 


'आई कुठे काय करते'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी


'आई कुठे काय करते'चा एक प्रोमो सध्या व्हायरल होत असून या प्रोमोमध्ये वीणा खूप घाबरलेली दिसत आहे. वीणाला एक मेसेज आला आहे तो मेसेज पाहून तिचा फोनही तिच्या हातातून खाली पडतो. त्यामुळे आता त्या मेसेजमध्ये नक्की काय आहे आणि आता विणावर कोणतं संकट आलं आहे हे जाणून घेण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने अनिरुद्धवर चिडली संजना; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष