Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहीर साबळे (Shahir Sable) यांचा नातू आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांभाळली आहे. या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Choudhary) शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने (Sana Shinde) शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.
'महाराष्ट्र शाहीर'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कधी?
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. प्रेक्षकांसह राजकारणी मंडळींनीदेखील या सिनेमाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे या सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता 18 फेब्रुवारी 2024 रोजी 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 18 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकांकडून 'महाराष्ट्र शाहीर'चं कौतुक
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकांनीदेखील कौतुक केली. अंकुश चौधरीचा दर्जेदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर सना शिंदेने या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करण्याचा घाट केदार शिंदेंनी घातला. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी अंकुशने खूप मेहनत घेतली आहे. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येईल. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. केदार शिंदेंचा हा सिनेमा 2023 मध्ये गाजला होता.
संबंधित बातम्या