Bigg Boss 17 Voting Trend : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत असलेल्या या कार्यक्रमाचा आता महाअंतिम सोहळा (Bigg Boss 17 Finale) पार पडणार आहे. त्यामुळे या पर्वाचा कोण विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता या कार्यक्रमाच्या 'टॉप 3' (TOP 3) स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.


'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 28 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. बिग बॉसचं हे पर्व संपणार म्हणून काही चाहते नाराज झाले आहेत. तर काही चाहत्यांना मात्र विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.






'बिग बॉस 17'च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), अरुण मोशेट्टी (Arun Moshety), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) या पाच स्पर्धकांचा समावेश आहे. चाहते सध्या त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करत आहेत. सोशल मीडिया वोटिंग ट्रेंड आता समोर आला आहे. 


'TOP 3'मधून अंकिता लोखंडेचा पत्ता कट


'बिग बॉस 17'चा वोटिंग ट्रेंड आता समोर आला आहे. या वोटिंग ट्रेंडनुसार, मुनव्वर फारुकीला सर्वाधिक वोट असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. अभिषेक कुमार दुसऱ्या, मन्नारा चोप्रा तिसऱ्या, अरुण मोशेट्टी चौथ्या आणि अंकिता लोखंडे पाचव्या स्थानावर आहे. 'टॉप 3'मधून आता अंकिता लोखंडेचा पत्ता कट झाला आहे. मुनव्वर फारुकीला 73.39%, अभिषेक कुमारला 14.76%, मन्नारा चोप्राला 5.81%, अरुण मोशेट्टीला 3.72% आणि अंकिता लोखंडेला 2.23% वोट्स मिळाले आहेत.  


'बिग बॉस 17'चं वोटिंग ट्रेंड कसं होतं?


'बिग बॉस 17'च्या वोटिंग ट्रेंडमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक वोट्स मिळालेले दाखवलं होतं. अखेर तोच या पर्वाचा विजेता झाला. त्यावेळी एमसी स्टॅन पहिल्या क्रमांकावर, शिव ठाकरे दुसऱ्या, प्रियंका चहर तिसऱ्या, अर्चना गौतम चौथ्या आणि शालीन भनोट पाचव्या स्थानावर होती. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17: "माझ्या बहिणीचे कपडे घातले, आता तिच्याविरोधात..."; मन्नारा चोप्राची बहीण अंकिता लोखंडेवर भडकली