Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते 'चला हवा येऊ द्या'; छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मिळतेय मनोरंजनाची मेजवानी


World Laughter Day 2023 : जागतिक हास्य दिन (World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हसण्याचे खरे तर अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. हसल्याने तणाव दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) आणि 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हे दोन कार्यक्रम करत आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर काही मालिका मात्र प्रेक्षकांवर छाप सोडण्यात कमी पडल्या आहे. आता 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Shiv Thakare : आईचा आशीर्वाद घेऊन 'खतरों के खिलाडी' गाजवायला शिव ठाकरे सज्ज


Shiv Thakare On Khatron Ke Khiladi 13 : 'बिग बॉस' फेम 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिव ठाकरेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ, 'महाराष्ट्राची किचन क्वीन' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Maharashtrachi Kitchen Queen : छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कथाबाह्य कार्यक्रम असतात. असच खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम 15 मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीचं नवं पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे कलाकार आता त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोरे जाताना दिसणार आहेत. कर्लस टिव्हीवरील धमाकेदार कार्यक्रम 'खतरों के खिलाडी'च्या (Khatron Ke Khiladi) 13 व्या पर्वाची प्रेक्षक खूप आतूरतेने वाट बघत आहेत. तसेच या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दलची देखील उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा