Shiv Thakare On Khatron Ke Khiladi 13 : 'बिग बॉस' फेम 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिव ठाकरेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. 


शिव ठाकरेने मराठी आणि हिंदी बिग बॉस चांगलच गाजवलं आहे. आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) माध्यमातून तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शिवला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 


शिव ठाकरे आणि त्याच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई औक्षण करताना दिसत आहे. त्यामुळे आईचा आशीर्वाद घेऊन 'खतरों के खिलाडी 13' गाजवायला शिव सज्ज झाला आहे. 'खतरों के खिलाडी 13' शिव ठाकरे जिंकावा, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. 


'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. या खेळासाठी तो खूप उत्सुक आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. आईचा आशीर्वाद घेण्याआधी शिवने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. 






'खतरों के खिलाडी 13'बद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला,"मी खूप ध्येयवादी आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती साध्य करण्याचा मी प्रयत्न करतो. बिग बॉसनंतर मला अनेक चांगल्या ऑफर मिळाल्या. रिअॅलिटी शो करायला मला आवडतं. त्यामुळे 'खतरों के खिलाडी 13'साठी मी होकार दिला. आता मला सिनेमा करण्याची इच्छा आहे". 


'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार असल्याने त्यांची खेळी पाहायला चाहते उत्सुक आहेत. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत 'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी त्याला चांगलच मानधन दिलं आहे. एका एपिसोडसाठी त्याने 5-8 लाख रुपये घेतले आहेत". 


संंबंधित बातम्या


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन; आपल्या माणसाचे स्टंट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक