Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे कलाकार आता त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोरे जाताना दिसणार आहेत. कर्लस टिव्हीवरील धमाकेदार कार्यक्रम 'खतरों के खिलाडी'च्या (Khatron Ke Khiladi) 13 व्या पर्वाची प्रेक्षक खूप आतूरतेने वाट बघत आहेत. तसेच या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दलची देखील उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. म्हणूनच 'खतरों के खिलाडी'बद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हांला देणार आहोत. 


केव्हा सुरु होणार 'खतरों के खिलाडी'चं 13 नवं पर्व?


खरंतर 'खतरों के खिलाडी'चं 13 (Khatron Ke Khiladi 13) नवं पर्व कधी सुरु होणार ही चर्चा या कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरु आहे. सोशल मिडियावरुन मिळणाऱ्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या शुटींगसाठी सगळे स्पर्धक 11 मे रोजी रवाना होतील. तसेच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


कुठे होणार शुटींग?


'खतरों के खिलाडी'च्या काही पर्वांचं शूटींग हे साऊथ आफ्रिकेमध्ये तर काही पर्वांचं शूटींग हे अर्जेंटीना मध्ये झालं आहे. सुरुवातीला हे शूटींग अर्जेंटीनामध्ये होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाचे शूटींग गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साऊथ आफ्रिकेमध्ये होणार आहे. या आठवड्यात या कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सगळी माहिती देण्याची शक्यता आहे. 






स्पर्धक म्हणून या कलाकारांची नावे निश्चित


रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रसंचालन करत असलेला 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमामध्ये सहभागी होणर असल्याची माहिती अनेक कलाकारंनी दिली आहे.' स्प्लिट्सविला 14'चा विजेता सौन्दूस मौफकीर, 'बिग बॉस 16'चा उपविजेता शिव ठाकरे, अर्चना गौतम, रोहित रॉय, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, नायरा बॅनर्जी, डेझी शाह या कलाकारांची नावे या यादीत आहेत.  याशिवाय या कार्यक्रमात शीजान खान आणि ऐश्वर्या शर्मा देखील स्टंट करताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ, 'महाराष्ट्राची किचन क्वीन' येणार प्रेक्षकांच्या भेटीला