Lata Mangeshkar : अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. लतादीदींच्या सुरेल पर्वाला छोट्या पडद्यावर आदरांजली देण्यात येणार आहे.
लता दीदींचं रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या गोड आणि सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच लता दीदींच्या सुरेल पर्वाला आदरांजली देण्यासाठी झी मराठीवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लतादीदींचा सुरेल आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.
'इंडियन आयडल मराठी'च्या (Indian Idol Marathi) मंचावरदेखील भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली जाणार आहे. दरम्यान गीतकार- कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेदेखील उपस्थित असणार आहेत. हा खास भाग प्रेक्षकांना 14 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा दोन तासांचा विशेष भाग असणार आहे.
संबंधित बातम्या
Majha Katta : जेव्हा सुरेश वाडकर शब्द विसरले...लतादीदींच्या आठवणींचा कट्टा
Kon Honaar Crorepati : पुन्हा येतोय 'कोण होणार करोडपती' कार्यक्रम, 23 फेब्रुवारीपासून नावनोंदणीला सुरुवात
Heropanti 2 Release Date : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' मध्ये मनोरंजनाचा डबल धमाका, ईदच्या मुहूर्तावर सिनेमा होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha