Lakshmichya Pavlani Latest Episode : 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिका दिवसेंदिवस आणखी मनोरंजक होत असल्याने चाहते आणखी उत्सुक असल्याचं दिसत आहेत. कला आणि अद्वैत यांच्यातील भांडणांचं रुपांतर हळूहळू मैत्रीमध्ये होताना दिसत आहे. यामुळे नयनाने कलावर खोटा आळ घेतल्यावर अद्वैत आईच्या विरोधात जात कलासोबत उभा राहिला आणि कलाने त्याचा विश्वास सार्थ ठरवला. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आगामी भागात काय होणार आहे, ते जाणून घ्या.
अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या नयना खरेचं पितळ उघड पडलं आहे. नयनाने कलावर घेतलेला आळ चुकीचा असल्याचं तिने सर्वांसमोर सिद्ध केलं आहे. त्यामुळे नयनाना चांदेकरांनी घराबाहेर काढलं आहे. या पुढच्या भागात कला नयनाच्या चांदेकरांच्या घरातील सर्वांची माफी मागायला लावताना दिसणार आहे. इतकंच काय तर, अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार आहे. त्यामुळे मालिका फारच रंजक वळणावर असल्याचं दिसत आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत पुढे काय घडणार?
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत खोट्या प्रेग्नेंसीचं कुंभाड रचणाऱ्या नयनाला चांदेकरांच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी कलाला फसवण्याचा नयनाटचा प्लॅन फसला. त्यामुळे चांदेकरांच्या घराबाहेर पडलेली नयना कलाची वाट लावण्याचं ठरवते आणि चांदेकरांकडून बदला घ्यायचा निर्धार करते. त्यासाठी नयना जीव देण्याचा प्रयत्न करते, यावेळी कला तिला चांदेकरांच्या घरी परत आणून सर्वांची माफी मागायला लावते.
मालिकेच्या आगामी एपिसोडचा प्रोमो
दरम्यान, या मालिकेतून आता अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हीने एक्झिट घेतली आहे. तिच्या जागी नवी अभिनेत्री आता नयना खरेची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री सानिका बनारसवाले 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत कलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या भागात 'नयना'च्या भूमिकेत अभिनेत्री अपूर्वा सकपाळ हिच्याऐवजी अभिनेत्री सानिका बनारसवाले ही अभिनेत्री दिसेल.