Lakshmichya Pavalani : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Pavlani) या मालिकेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडामोडी घडत आहे. नयनाने उचललेल्या पावलामुळे खरे आणि चांदेकरांच्या घरात ताणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कला चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी गेली खरी पण तिला सुनेचा दर्जा मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेला अल्पावधीच प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच खरे आणि चांदेकरांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार आणि नात्यांची परीक्षा घेणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


लग्नाच्याच दिवशी नयना अद्वैत चांदेकरचा भाऊ राहुलसोबत पळून गेली. राहुलने नयनाला लग्नाचं वचन दिलं, पण अजुनही तिच्यासोबत लग्न केलं नाहीये. तसेच नयना राहुलच्या फोनवरुन  जेव्हा तिच्या आईला फोन करते त्यावेळी राहुल तिच्यावर चिडतो. तसेच राहुल अद्वैतला धडा शिकवण्यासाठी नयनाचा वापर करत असल्याचं सध्या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच नयनाने उचलेल्या या पावलामुळे कलाला चांदेकरांच्या शिक्षा भोगावी लागतेय. 


राहुल नयनाला अर्ध्या वाटेवर सोडणार


लग्नाच्या दिवसापासून राहुल आणि नयना कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये राहत होते. त्यांनी घरच्यांसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. पण आजच्या भागात राहुल आणि नयना त्या हॉटेलमधून बाहेर पडतात. राहुल नयनाला तिच्या घराच्या वाटेवर सोडतो आणि तिला सांगतो मी तुला लवकरच घ्यायला येतो. पण तिला सोडल्यानंतर ब्यात गेली एकदाची असं म्हणून  निघून जातो. त्यामुळे राहुल आता नयनाला अर्ध्या वाटेवरच सोडणार की तिच्याशी लग्न करणार हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. 


चांदेकरांच्या घरात कलाच्या आईवर चोरीचा आरोप


सरोज कलाला चांदेकरांच्या घरात राहण्यासाठी तिच्या माहेरच्यांसोबतचे संबंध तोडायला लावते. कला देखील तिच्या आई बाबांसाठी तिच्या माहेरशी असलेले सगळे संबंध तोडते.  पण कलाची आठवण येत असल्याने कलाची आई चांदेकरांच्या घरात कलाला भेटण्यासाठी जाते. त्यावेळी रोहिणी आत्या एका दागिना कलाच्या आईला घालण्यासाठी आग्रह करते आणि निघून जाते. तेवढ्यात अद्वैत खोलीत येतो आणि त्याला वाटतं नयनाची आई चोरी करते. तो घराच्यांसमोर कलाच्या आईवर आरोप करतो. कला तेव्हा अद्वैतचे हे आरोप खोडून काढत रोहिणी आत्यांनी आईला हार घालायला लावल्याचं उघड करते. 
 


ही बातमी वाचा : 


Hemangi Kavi : हिंदी पुरस्कार सोहळ्यात 'जय महाराष्ट्र', उर भरून आला, कायच्या काय भारी वाटतंय! हेमांगीने सांगितला अनुभव