Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या सहभाग प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक मिस्डकॉल द्या आणि एक कोटी रुपये जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला होता.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आता आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये शाळेतले शिक्षण काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत, स्पर्धेत कोण कोण भाग घेणार आहेत? त्यावर निशासोडून इतर सर्व विद्यार्थी स्पर्धेक सहभागी होण्यासाठी होकार देतात. त्यानंतर सचिन खेडेकर म्हणत आहेत,"ही आहे निशा तिला मिळत नव्हती दिशा. निशाच्या घरी आले पाहुणे... त्यांच्यासमोर तिने गायले गोड गाणे... त्यानंतर तिच्या घरची मंडळी तिला म्हणतात,"निशा तू किती गोड गाणं गात आहेस. व्हायचं का तुला सिंगर? त्यानंतर निशा म्हणते,"जाऊ दे ना गं".
सचिन खेडेकर पुढे म्हणत आहेत,"सर्वांच्या डोक्यात होता हाच क्वेशन की कोटींचं प्रोजेक्ट क्लाइंट करेल का सॅन्शन.. निशाने दिलं बेस्ट सजेशन... बॉस म्हणाली, तुच का नाही देत प्रेझेंटेशन? त्यावर निशा म्हणतेय,"जाऊ द्या ना मॅम". त्यानंतर पुन्हा सचिन खेडेकर म्हणत आहेत,"आव्हानांपासून निशा राहते कायम दूर, कारण तिचा नेहमी माघारीचा सूर".
प्रोमोमध्ये पुढे सचिन खेडेकर आणि निशा 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर खेळ खेळताना दिसत आहेत. दरम्यान सचिन खेडेकर म्हणत आहेत,"आता आहे आव्हानांची खरी कसोटी.. कारण मिळणारेत दोन कोटी आणि तुमच्याकडे कोणतीही लाईफलाईन नाही, काय करायचं? यावर उत्तर देत निशा म्हणत आहे,"जाऊ दे ना सर... असं म्हणत सतत मागे राहिले आहे. पण आता होऊन जाऊ दे सर.. आता मागे नाही राहायचं".
'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व 'या' दिवशी होणार सुरू
'मनासारखं जगायचं असेल, तर आता मागे नाही राहायचं. 'कोण होणार करोडपती' 29 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर, असं म्हणत कोण होणार करोडपती'चा नवा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 29 मेपासून प्रेक्षकांना 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या