Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' हा कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कुकरी शोचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. "आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार". म्हणत या कुकरी शो ची सुरुवात झाली होती. या आठवड्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाकार नाही तर काही सुप्रसिद्ध खास पाहुणे या किचनमध्ये महाराजांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज होणार आहेत. 


'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात ॲड. उज्ज्वल निकम, आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश आणि ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय खेळाडू राही सरनोबत येणार आहे. या खास पाहुण्यांची  किचन कल्लाकारच्या किचनमध्ये चुरस रंगणार आहे.






आता या तिघांमध्ये महाराजांना आपल्या पाककलेने कोण खुश करेन आणि किचन कल्लाकारचा किताब कोण मिळवेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येणार आहेत काही खास पाहुणे म्हणत 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


Happy Republic Day 2022 : या प्रजासत्ताक दिनी 'हे' देशभक्तीपर सिनेमे पाहाच!


Bigg Boss 15 Grand Finale Date : 'या' तारखेला होणार बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले, कोण आहेत फायनलिस्ट जाणून घ्या...


KGF2 ते Brahmastra पर्यंत 'हे' सात बिग बजेट सिनेमे 2022 मध्ये होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha