Vandana Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अनेक मजेशीर किस्से आणि आठवणी सांगितल्या.
वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संबंधित एक मजेशीर किस्सा खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये सांगितला. त्या म्हणाल्या, "चार पाच वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल, नवीन गाडी घेऊन मी येत होते. राज ठाकरे तिथे फेऱ्या मारत होता. माझ्या नवीन गाडीला प्लास्टिकचं कव्हर होते. ते कव्हर मी काढलं नव्हतं. त्यानं माझी गाडी थांबवली आणि मला म्हणाला गाडी खाली उतर, पुढे तो म्हणाला, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिकचं कव्हर ठेवलंय? त्यानंतर त्यानं गाडीमधलं प्लास्टिकचं कव्हर फाडलं."
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वंदना गुप्ते या एक मजेशीर किस्सा सांगतात. त्या म्हणातात, "मला जेव्हा शिरीषनं प्रपोज केलं, तेव्हा मी तिच्या कुटुंबाला भेटायला त्याच्या घरी गेले. माझ्या सासूबाईंनी मला विचारलं की, गाणं म्हणशील का? तेव्हा मी पाडाला पिकलाय आंबा हे गाणं म्हणलं. तेव्हा माझा होणारा नवरा तिथे बसला होता. तेव्हा त्यानं जी मान खाली घातली होती ती अजून वर काढलेली नाही."
पाहा प्रोमो:
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. आता वंदना गुप्ते या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये आणखी कोणते किस्से सांगणार? याकडे अनेकांचे लक्ष लागेल आहे. हा एपिसोड प्रेक्षकांना 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :