Jennifer Mistry On Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालाने  (Jennifer Mistry) 14 वर्षांनंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर तिने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. 


जेनिफर मिस्त्रीची एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,"माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका. मी इतके दिवस मौन बाळगला. आतापर्यंत मी शांत होते पण आता माझा संयम सुटत चालला आहे. सत्य काय आहे हे देवाला माहिती आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही". 


जेनिफर मिस्त्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. नेहमी सत्याचा विजय होतो". जेनिफरच्या या व्हिडीओवर घाबरु नको...आम्ही तुझ्यासोबत आहोत. सत्य लवकरच सर्वांना कळेल, गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी, लवकरच तुम्हाला न्याय मिळेल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत".






'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडण्याबद्दल जेनिफर मिस्त्री म्हणाली,"तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडण्याचा मी निर्णय घेतला कारण सोहिल रमानी आणि जतिन बजाज यांनी सेटवर माझा अपमान केला होता. 7 मार्चला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि होळीदेखील होती. त्यावेळी 
सेटवर मला अपमानित करण्यात आले. जबरदस्तीने सेटवर थांबण्यासाठी धमक्या देण्यात आल्या". 


जेनिफर मिस्त्रीने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडली आहे. 6 मार्च 2023 रोजी तिने शेवटचा एपिसोड शूट केला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे प्रोडक्शन हेड सोहिल रमानी यांनी जेनिफर मिस्त्री बंसीवालानं केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले,"हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. आम्ही सर्व आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ". 


संबंधित बातम्या


Jennifer Mistry Bansiwal: जेनिफरनं 'तारक मेहता' च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर मालिकेतील आत्माराम भिडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...