Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. 


नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री होणार असे म्हटले जात आहे. नेहाचा पहिला नवरा कोण असणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण त्याच्या येण्याने नेहा-यशला पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार फिस्कटणार असा अंदाज वर्तवला जात आहे. 


नेहा आणि यश साजरी करणार पहिली वटपौर्णिमा


‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच सोबत यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला. या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना नेहा आणि यश पहिली वटपौर्णिमा साजरी करताना पहायला मिळणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करताना दिसणार आहे. नेहा-यशचा वटपौर्णिमा हा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे नेहा आणि यश पहिली वटपौर्णिमा उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. 






श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाची रेशीमगाठ बांधली जाणार; होणार दोन तासांचा विवाह विशेष भाग


Majhi Tujhi Reshimgath : नेहा आणि यश साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; होणार विशेष भाग