Brahmastra Mouni Roy Look Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन आणि नागार्जुनच्या लूकनंतर आता अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) लूक निर्मात्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
निर्मात्यांनी एक मोशन पोस्टर शेअर करत मौनी रॉयचा लूक शेअर केला आहे. मौनीच्या लूकवरून या सिनेमात मौनी नकारात्मक भूमिकेत असणार याचा अंदाज येत आहे. सिनेमातील मौनीचा लूक पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत आहेत. मौनीने सोशल मीडियावरदेखील मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिनेमात मौनी ‘दमयंती’ हे पात्र साकारणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा, बॉलिवूडच्या बादशाहाची दिसणार झलक
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कापडिया दिसणार आहेत. तर शाहरुख खानची एक झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 300 कोटींपेक्षा अधिक बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 15 जूनला ट्रेलर रिलीज होणार असून 9 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रह्मास्त्र'मध्ये होणार धमाका!
'ब्रह्मास्त्र' हा तीन भागांचा फँटसी सिनेमा आहे. ज्यामध्ये रणबीर ‘शिवा’च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, आलिया भट्ट ‘ईशा’च्या भूमिकेत आहे. जी त्याची मैत्रीण आहे. अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञ च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे.
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या सिनेमाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या सिनेमाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या