Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 14 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती 15' सुरू होत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक प्रिया पाटीलने (Priya Patil) डिझाइन केला आहे.


वर्षानुवर्षे प्रेक्षकांनी 'कौन बनेगा करोडपती'  या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांना अशा लक्षवेधी पोशाखांत पाहिले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होते. प्रत्येक सीझनमध्ये, टेलिव्हिजनवरील या लाडक्या होस्टला आकर्षक बनवण्यात, स्टायलिस्ट प्रियाचा मोलाचा वाटा आहे, मग तो त्यांचा थ्री पीस सूट असो, बो टाय, स्टायलिश स्कार्फ असोत किंवा आणखी काही. जसे या ज्ञान-आधारित गेम शोमध्ये खेळात काही घटक समाविष्ट करून थोडा बदलाव आणलेला दिसेल, तसेच प्रिया देखील आजकालच्या फॅशन ट्रेंडनुसार बिग बी ला शोभेल असा स्टायलिश पोशाख देणार आहे, जो हा महानायक मोठ्या उत्साहाने परिधान करेल.


 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वातील अमिताभ बच्चन यांच्या लूकबद्दल बोलताना प्रिया पाटील म्हणाली,"कौन बनेगा करोडपती’च्या 15व्या सीझनसाठी मला लुक थोडा नवीन आणि टवटवीत ठेवायचा आहे. क्लासिक लुक जसाच्या तसा कायम ठेवून आम्ही काही आणखी नवीन बदलाव आणत आहोत. सरांनी, उत्कृष्ट थ्री पीस सूट, बंद गळ्याचे सूट आणि जोधपुरी सूट घातलेले दिसतील पण मी त्यांना कॉन्ट्रास्ट रंगसंगतीचे कपडे देत आहे जे खुलून दिसतील. आणखी खुलून दिसण्यासाठी वेस्टकोट्समध्ये वाईन कलर सोबत नेव्ही ब्लू, काळे पांढरे, बारीक रेषांसोबत प्लेन, चौकटीसोबत प्लेन, असे अनेक प्रकार असतील. त्यांच्या शर्ट्सबाबत देखील मी कॉलरसोबत कॉन्ट्रास्ट पायपिन, उठावदार ब्रोचेस, लेपल पिनचा वापर असे थोडेफार पण जाणवण्यासारखे बदल केले आहेत, जेणेकरून त्यांचा लुक आणखी परिपूर्ण आणि भारदस्त दिसेल. उत्कृष्ट जोधपुरीसोबत खास शाल आणि त्याला साजेसा ब्रोच असेल.”


केबीसीसाठी बिग बी ची स्टायलिस्ट म्हणून काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना प्रिया सांगते,अमिताभ बच्चन महान आहेत आणि बरीच वर्षे त्यांच्याकडे पाहून मी खूप काही शिकले आहे. त्यांचे समर्पण, व्यावसायिकता आणि बारीकसारीक तपाशीलांकडे लक्ष देणे हे मी त्यांच्याकडून आत्मसात केले आहे आणि हे सर्व त्यांच्या पेहेरावात दिसून येते. मी नेहमीच सगळ्यांना सांगते की सरांना स्टायलिस्टची गरज नाही, ते स्वतःच एक स्टाईल आयकॉन आहेत. पोशाख माणसाला घडवत नाही, तर माणूस पोशाख घडवतो. ते जे परिधान करतात तोच ट्रेंड बनतो आणि ते सगळ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत.”


'कौन बनेगा करोडपती'बद्दल जाणून घ्या...


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. या कार्यक्रमामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. कार्यक्रमातील एक पर्व सोडून बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले आहेत. केबीसीचं तिसरं पर्व बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) होस्ट केलं होतं. 'कौन बनेगा करोडपती 15' प्रेक्षकांना सोनी वाहिनीवर पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Kaun Banega Crorepati : 'ज्ञानदार, धनदार आणि शानदार...' कौन बनेगा करोडपती 15 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमो आऊट