Kbc 15:  छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमाचा 15 वा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कार्यक्रमाच्या इतर सीझन प्रमाणेच यंदाच्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केबीसी-15 या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोडही खूप धमाकेदार होता. या एपिसोडमध्ये गुजरातच्या गांधीनगरमधील रश्मिका नंदा या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळून हॉट सीटवर पोहचल्या. रश्मिका बिग बींसमोर येताच ती रडू लागल्या, त्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाणी प्यायला दिले आणि त्यांचे अश्रू पुसले. त्यानंतर रश्मिका यांनी गेम खेळण्यास सुरुवात केली. पण रश्मिका या '3 इडियट्स' (3 Idiots) या चित्रपटाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. 


कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रश्मिका यांनी 3, 20, 000 रुपये जिंकले पण 6 लाख 40 हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर रश्मिका देऊ शकल्या नाहीत.  6 लाख 40 हजार रुपयांसाठी रश्मिका यांना बिग बींनी हा प्रश्न विचारला होता-


प्रश्न-


खालीलपैकी कोणत्या चित्रपटात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनय केला आहे?


A. दिल चाहता है


B. 3 इडियट्स


C. जिंदगी ना मिलेगी दोबारा


D. जाने तू या जाने ना


उत्तर-B. 3 इडियट्स


या प्रश्नाचे उत्तर  रश्मिका यांना माहित नव्हते, त्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉल या  लाइफलाइनचा वापर केला  केला, ज्यामध्ये त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.  नंतर, डबल डिब लाईफलाइन वापरून, रश्मिका यांनी पर्याय C आणि पर्याय D सांगितले जे पूर्णपणे चुकीचे उत्तर ठरले. यासह रश्मिका यांचा केबीसीमधील खेळ संपला. रश्मिका यांनी  3,20,000 रुपये केबीसीमध्ये जिंकले. 






अमिताभ बच्चन  2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाच बघत असतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:


KBC 15: 'क्रिकेट वर्ल्ड कप'शी संबंधित 'या' प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही केबीसीमधील स्पर्धक; तुम्हाला माहितीये का उत्तर?