Rupali Bhosle: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले ही  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. या मालिकेत  संजना ही भूमिका रूपाली साकारते. रुपाली ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. नुकतीच रुपालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रुपालीनं विमान प्रवासादरम्यान तिला आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


रुपाली भोसलेची पोस्ट


रुपालीनं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विमानाच्या केबिन क्रूसोबत दिसत आहे. तसेच रुपालीनं तिला विमानात मिळालेल्या गिफ्टचा फोटो देखील शेअर केला आहे. रुपालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, "हे खूप आश्चर्यकारक आहे . आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यंच्यासोबत फोटो काढताना त्यांना काहीतरी गिफ्ट देतानाचे फोटो पाहिले होते . पण आज जेव्हा माझ्या सोबत हे घडला तेव्हा खरच खूप छान वाटला. का माहित नाही पण डोळे पाणावले. थोडी इमोशनल झाले. पण चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आली.  capri.hostie तू माझा दिवस खास केलास.  आणि धन्यवाद इंडिगो.  इंडिगो एअरलाइन्सच्या सर्व कर्मचार्‍यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.. खूप प्रेम." रुपालीनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 






आई कुठे काय करते या मालिकेमुळे रुपालीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका   मिलिंद गवळी हे साकारतात. तर अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुरणी प्रभुलकर या साकारतात. या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असताता. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  आई कुठे काय करते  या मालिकेतील कलाकारांनी  त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या: 


'तो काळ फारच भीषण होता...'; जेव्हा रुपाली भोसलेनं सांगितली होती तिची स्ट्रगल स्टोरी