Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. 2000 साली हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी जबरदस्त कमबॅक केलं. या मंचाने आजवर अनेकांना करोडपती बनवलं आहे. पण 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या कार्यक्रमाचे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) ठरले होते.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामुळे अनेक लोक लखपती आणि करोडपती झाले आहेत. घर घेणं, गाडी खरेदी करणं अशी अनेकांची स्वप्न साकार झाली आहेत. या कार्यक्रमामुळे बिग बीचंही कर्ज मुक्त झालं आहे. तसेच त्यांना स्टार करण्यात या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा आहे.
हर्षवर्धन नवाथे ठरले पहिले करोडपती!
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे हर्षवर्धन नवाथे पहिले करोडपती ठरले होते. त्यावेळी ते बॅचलर असून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. पण 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात ते सहभागी झाले, करोडपती झाले आणि आयुष्यचं बदललं. हर्षवर्धन नवाथे यांची पत्नी सारिका नवाथे (Sarika Nawathe) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
हर्षवर्धन नवाथे सध्या मुंबईत राहत असून एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत आहेत. हर्षवर्धन यांच्या पत्नीचं नाव सारिका आहे. हर्षवर्धन आणि सारिका यांना दोन मुलं आहेत. सारिका या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक मालिका आणि सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.
हर्षवर्धन यांना मिळालेली मॉडेलिंगची ऑफर
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन नवाथे म्हणाले की,"मी करोडपती झाल्यानंतर लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. मी स्टार झालो होतो. पण मिळालेल्या पैशांचा मी चांगला वापर केला. विदेशात जाऊन शिक्षण घेतलं. त्यामुळे मला अभिनय आणि मॉडेलिंगसाठी अनेकांनी विचारणा केली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनेक शाळा-कॉलेजमध्ये बोलवत असे".
पहिल्या करोडपतीचं 'ते' स्वप्न अपूर्णच...
IAS ऑफिसर होण्याची हर्षवर्धन नवाथे यांची इच्छा होती. पण 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमानंतर ते परदेशात गेले आणि हे स्वप्न अपूर्णच राहिलं. हर्षवर्धन नवाथे यांची स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू होती. पण परदेशात गेल्यामुळे त्यांचा फोकस हलला आणि आयएएसची अधिकारीसाठीची परिक्षा त्यांना देता आली नाही.
संबंधित बातम्या