Kaun Banega Crorepati 15:  अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत बिग बी हे या कार्यक्रमात स्पर्धकांना काही  चित्रपटातील मजेदार किस्से आणि आठवणी सांगतात. केबीसी-15 या शोच्या गेल्या एपिसोडमध्ये,   शुभम नावाचा स्पर्धक गेम खेळण्यासाठी हॉट सिटवर बसला. शुभमने या कार्यक्रमामध्ये  50 लाख रुपये जिंकले. पण त्याला एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हते. त्यामुळे त्याला खेळ सोडावा लागला.


एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-



6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकणाऱ्या विमानाचे नाव कोणावर आधारित होते?  केबीसीमध्ये एक कोटींसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नासाठी चार ऑप्शन्स देखील बिग बी यांनी शुभमला दिले. 


ऑप्शन-



A एक पौराणिक शस्त्र
B एक चित्रपटामधील पात्र
C पायलटची आई
D ज्या ठिकाणी ते तयार केले गेले होते.


बरोबर उत्तर- C  पायलटची आई हे आहे.


अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर  शुभमने प्रश्न वारंवार वाचायला सुरुवात केली. पण त्याच्याकडे लाइफलाइन नव्हती. त्यामुळे त्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला. उत्तर जाणून घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी शुभमला एका पर्याय  निवडायला सांगितला. शुभमने A पर्याय निवडला. त्यानंतर बिग बी म्हणतात की, ते चुकीचे उत्तर आहे.  


शुभम हा एक कोटी रुपये जिंकू शकला नाही. मात्र, 50 लाख त्यानं केबीसीमध्ये जिंकले आहेत. शुभम हा इंदूरचा रहिवासी आहे. तो एका खासगी टेलिकॉम कंपनीत प्रोजेक्ट ट्रिगर म्हणून काम करतो.






अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. 


 पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या  15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. मात्र, सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणला देता आलं नाही. आता या शोमध्ये आणखी कोणता स्पर्धक करोडपती  होईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या:


Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही सात कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?