Salman Khan Bigg Boss 17 Promo Out : 'बिग बॉस ओटीटी 2'नंतर (Bigg Boss Ott 2) चाहते 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) प्रतीक्षा करत आहेत. काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या 'बिग बॉस' (Bigg Boss) या कार्यक्रमाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. 'बिग बॉस 16' संपल्यानंतर चाहते या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17 Promo) या कार्यक्रमाचा प्रोमो आता आऊट झाला आहे. 


'बिग बॉस 17'चा प्रोमो आऊट! (Bigg Boss 17 Promo Out)


'बिग बॉस 17' या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रोमो आता आऊट झाला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये सलमान खान म्हणत आहे,"आतापर्यंत तुम्ही 'बिग बॉस'चे फक्त डोळे पाहिले असतील. पण आता हृदय, बुद्धी आणि शक्ती असे बिग बॉसचे तीन अवतार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आत्तासाठीच एवढचं..प्रोमो संपला". कलर्सने 'बिग बॉस 17'चा प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,"यंदा 'बिग बॉस' एक वेगळाच रंग दाखवणार आहे..तुम्हीही थक्क व्हाल". 






'बिग बॉस 17'चा प्रोमो आऊट झाल्याने चाहत्यांची उत्सुकता आता दुप्पट वाढली आहे. चाहते आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे,"प्रोमो आता आऊट झाल्याने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस 17' प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतं. तर दुसऱ्याने लिहिलं आहे,'बिग बॉस 17'साठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आणखी एकाने लिहिलं आहे,"काहीही झालं तरी यंदाचं पर्व हिट होऊ शकत नाही". 


'बिग बॉस ओटीटी 2' काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. जिओ सिनेमावर या कार्यक्रमाचं प्रसारण होत होतं. या पर्वात अभिषेक मल्हान, एल्विश यादव आणि मनीषा रानी यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. पण एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी 2'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या कार्यक्रमाला चांगलाच टीआरपी मिळाला होता. 


संबंधित बातम्या


Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव! रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास